
सामना प्रतिनिधी । बीड
तब्बल पाच लाख रुपयांची लाच घेतांना जेरबंद केलेले बीड चे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी एम कांबळे यांची एक माहिती समोर आली आहे. लाच घेणारे कांबळे यांनीच भ्रष्टाचार निर्मुलन सप्ताहात जिल्हाधिकारी रजेवर असल्याने सर्व कर्मचार्यांना लाच घेणार नसल्याची शपथ दिली होती.
29 ऑक्टोबर रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लाच लुचपत विभागाने आयोजित केलेल्या भ्रष्टाचार निर्मुलन सप्ताहात कर्मचार्यांना लाच घेणार नाही, प्रशासकीय कामकाज भ्रष्ट्राचार मुक्त करू अशी शपथ दिली जाणार होती, जिल्हाधिकारी बाहेरगावी असल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी बी एम कांबळे यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना भ्रष्टाचार मुक्त कारभार करू अशी शपथ दिली होती. ही शपथ देऊन अवघे तीन महिनेच उलटले शपथ देणारेच लाच घेतांना रंगेहात पकडले गेले.





























































