‘या’ देशांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही

2431

जगभरातील अमेरिका, चीन, इटली, फ्रान्स, इंग्लंड, हिंदुस्थान अशा बड्या देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. जगातील मोजकेच देश सोडले तर जगभरातील छोट्या मोठ्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. जगभरात हाहाकार उडवणाऱ्या या कोरोनाचा काही देशांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही.

यात पॅसिफिमधील काही छोट्या देशांचा समावेश आहे. वानुआटू, सामोआ, किरिबाटी, मायक्रोनशिया, टोंगा, मार्शनल आयलँड पालऊ, तुवालु, सोलोमन आयलँड या लाखाच्या आत लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचे समोर आले आहे. अमेरिका,इटली या देशांमध्ये कोरोनाचे जितके रुग्ण आहेत तितकी यातील काही देशांची लोकसंख्याच आहे.

उत्तर कोरियाबाबतचा सस्पेन्स कायम
चीनच्या अगदी जवळ असलेल्या उत्तर कोरियाने त्यांच्याकडे अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचा दावा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र उत्तर कोरिया त्यांच्या कोरोनाग्रस्तांची आकडेवारीच जाहीर करत नसल्याचे समजते. काही जण असेही सांगतात की उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याने कोरोनाची लागण झालेल्यांची हत्या करण्याचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या