बिहारमध्ये प्रेमी युगुलाला जमावाची मारहाण, तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहार येथील बेगुसरायमध्ये एका प्रेमी युगुलाला जमावाने मारहाण केली असून त्यातील तरुणीवर बलात्काराचाही प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना बेगुसरायमधील जगदर या गावात घडली एक प्रेमी युगुल रस्त्याने जात असताना पाच ते सहा तरुणांच्या एका टोळक्याने त्यांची वाट अडवली. युगुलाला शिवीगाळ करत या टोळक्याने लाठ्याकाठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या युगुलाने त्यांच्याकडे दयेची याचना केली. पण त्यावर न थांबता या टोळक्यांनी तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. दरम्यान यातील एका तरुणाने या घटनेचा व्हिडीओही बनवला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

काही काळापूर्वी अलवर इथेही अशाच प्रकारची घटना घडली होती. एका दलित महिलेवर तिच्या पतीसमोरच सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेचा व्हिडीओ बनवून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता.