प्रेमी युगुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न, आई वडिलांनी आयसीयुत लावले लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हिसार

घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने हरियाणात एका प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांची तब्येत बिघडल्याने इस्पितळात दाखल करण्यात आले. तेव्हा घरच्यांना आपली चूक कळाली आणि आयसीयुतच दोघांचे लग्न लावले.

हरियाणमधील हिसारम्धील २३ वर्षीय मीत आणि कुसुम हे दोघे डी.एन महाविद्यालयात शिकत होते. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण दोघांच्या लग्नाला दोघांच्या घरच्यांचा विरोध होता. दोघांनी आपल्या घरच्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला पण घरच्यांचा विरोध मावळला नाही. हतबल झालेल्या प्रेमी युगुलाने आत्महत्येचा निर्णय घेतला. घराजवळ्च्या एका मंदिरासमोर तरुणाने आपल्या भावाला आपण आत्महत्या करत असल्याचे फोनवरून सांगितले. त्यानंतर दोघांनी कीटकनाशक खाऊन आपला जीव देण्याचा प्रयत्न केला. तरुणाच्या भावाने घरच्यांना ही गोष्ट सांगितली आणि घटनास्थळी धाव घेतली. अत्यावस्थेत असलेल्या जोडप्याला घरच्यांनी इस्पितळात दाखल केले. यानंतर दोघांच्या घरच्यांना आपली चूक लक्षात आली आणि इस्पितळातच दोघांचे लग्न लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आयसीयुतच त्यांना लग्न समारंभाचे कपडे घातले आणि लग्नाच्या विधी पार पाडल्या. या सगळ्यात तरुणाची तब्येत सुधारत आहे पण तरुणीची अवस्था गंभीर आहे.