सेक्स करताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने प्रेमी युगुलाचा मृत्यू

सेक्स ही खरे तर खासगी गोष्ट. परंतु सेक्स करताना जर योग्य ती खबरदारी घेतली नाही तर काय होते हे इक्वॅडोर देशामध्ये घडलेल्या विचित्र दुर्घटनेवरून दिसून येते. येथे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बाल्कनीमध्ये सेक्स करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका प्रेमी युगुलाचा मृत्यू झाला आहे. क्विटो शहरामध्ये ही घटना घडली.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शैक्षणिक वर्ष संपल्याचा आनंद साजरा करण्यासाठी 28 वर्षीय महिलेने तिच्या घरात सगळ्यांसाठी एक पार्टी आयोजित केली होती. ही पार्टी संपल्यानंतर ही महिला आणि तिचा 35 वर्षीय प्रियकर घराच्या बाल्कनीमध्ये जाऊन सेक्स करु लागले. मात्र यादरम्यान दोघांचा तोल गेला आणि ते तिसऱ्या मजल्यावरुन नग्न अवस्थेमध्येच थेट शेजारच्यांच्या टेरेसवर पडले.

दोघेही खाली पडल्यानंतर मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी बाहेर येऊन पाहिले तेव्हा ते अर्धनग्न अवस्थेमध्ये होते. रुग्णालयात दाखल करूपर्यंत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ही महिला एका 8 वर्षांच्या मुलीची आई होती असे उघडकीस आले आहे. या घटनेमागील कारणाचा पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या