
प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मनमाड-दौंड रेल्वेमार्गावरील महादेववाडी शिवारात घडली आहे. दोघेही विवाहित आहेत. राजू बाबा कोळपे (38) व राणी राजेंद्र साबळे (30) अशी मृतांची नावे आहेत.
राजू व राणी दोघे विवाहित असून, त्यांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांतून सोमवारी सकाळी दोघेही घरातून बाहेर पडले. याबाबत घरच्यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये ‘मिसिंग’ची तक्रार केली होती. सोमवारी रात्री उशिरा दोघांनी महादेववाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे.



























































