कोरोना काळात जोडप्याचं समुद्र किनाऱ्यावर प्री वेडिंग फोटोशूट, एक लाट आली आणि…

1911

कोरोना विषाणूने सध्या थैमान घातलं आहे. असं असलं तरी अनेकांचा उत्साह कमी झालेला नाही. सुरक्षेची खबरदारी घेण्याची वारंवार विनंती करूनही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. असंच काहीसं एका जोडप्याच्या बाबतीत घडलं आहे.

सोशल मीडियावर एका जोडप्याच्या प्री वेडिंग फोटोशूटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एका समुद्र किनाऱ्यावर त्यांचे फोटो काढण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. अचानक फोटो काढताना एक गंभीर घटना घडते आणि दोघेही समुद्रात फेकले जातात, असंही या व्हिडीओत दिसत आहे.

हा व्हिडीओ दक्षिण कॅलिफोर्निया भागातला असून तिथे प्री वेडिंग फोटोशूट वेळी ही घटना घडली आहे. एका जोडप्याचं शूट सुरू असताना अचानक एक मोठी लाट आली आणि त्या दोघांना वाहून नेऊ लागली. सुदैवाने किनाऱ्यावर तैनात असलेल्या लाईफ गार्ड्सनी ते दृश्य पाहिलं आणि समुद्रात उडी टाकून त्यांना वाचवलं. एबीसी न्यूज नावाच्या वृत्तवाहिनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या