ट्रेंड – रुग्णालयात बांधली लग्नगाठ

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात एका जोडप्याने चक्क रुग्णालयात लग्नगाठ बांधल्याचे दिसतेय. झाले असे की, तरुणाचा लग्नाच्या काही दिवस आधी अपघातात पाय मोडला. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. परंतु लग्नाची तारीख आधीच ठरली होती. त्यामुळे जोडप्याने रुग्णालयातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. या अनोख्या लग्नासाठी रुग्णालयाची खोली सजवण्यात आली. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत जोडप्याने सात फेरे घेतले.