‘कोवॅक्सीन’ला डॉक्टरांचा विरोध! साइड इफेक्ट झाल्यास भारत बायोटेक भरपाई देणार!

जगातील सर्वात मोठय़ा लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असताना आज पहिल्याच दिवशी भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस घेण्यास दिल्लीतील डॉक्टरांनी नकार दिला आहे. दरम्यान, आमच्या लसीमुळे काही साइड इफेक्ट झाल्यास भरपाई देऊ अशी घोषणा भारत बायोटेक कंपनीने केली आहे.

कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन लसींच्या वापरासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोविशिल्ड लसीची निर्मिती केली असून, त्याचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टीटय़ुटने केले आहे. कोवॅक्सीन लसीची तिसऱया टप्प्यातील मानवी चाचणी पूर्ण झालेली नाही असे म्हणणे आहे.

त्यामुळे आज दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांनी कोवॅक्सीन लस टोचून घेण्यास नकार दिला. आम्हाला सीरमची कोविशिल्ड लस द्या अशी मागणी डॉक्टरांनी केली. यासंबंधीचे पत्रच रुग्णालयाचे अधीक्षकांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या