
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून आज राज्यात 19 रुग्ण सापडले. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक 8 रुग्ण सापडले आहेत, तर मृत्यूचा आकडा 32 वर पोहोचला आहे. दरम्यान, सध्या राज्यात 298 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 25 हजार 519 चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 2 हजार 337 रुग्ण सापडले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 86 टक्क्यांवर पोहोचले आहे.