
आपण सारेच जण कोरोना या आजाराच्या महामारीला सामोरेजात आहोत. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितील दिव्यांग व्यक्तींना देखील सामोरे जावे लागत आहे. दृष्टीहीन व्यक्तींना दिसत नसल्याने या आजाराचे पुरेसे आकलंन होऊ शकत नाही. म्हणूनच संस्थेचे अध्यक्ष अरुण भास्कर यांनी या आजाराविषयेचे काम हाती घेतले आहे. त्यामूळे दृष्टीहीन असलेल्यांना या आजाराची माहिती कळण्यास मदत होईल.
कोव्हिड 19 या ब्रेल पुस्तकात या रोगाची लक्षणे, तो होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व महाराष्ट्रात असलेली जिल्हा रुग्णालये व त्यांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. सर्व इच्छुकांनी या पुस्तकासाठी ‘दि ब्लाइंङ वेल्फेअर ऑर्गनाइजेशन, शालिमार, नाशिक’ येथील संस्थेच्या कार्यालयाच्या 0253-2595244 या दुरध्वनी क्रमांकावर रविवार वगळता सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत. हे पुस्तक पोस्टाद्वारे किंवा कुरियरने पाठविण्याची सोय देखील करण्यात आली आहे.
हे पुस्तक छापण्यासाठी संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ. विजय घाटगे यांचे मार्गदर्शन लाभले असून माहिती संकलन अध्यक्ष अरुण भास्कर यांनी केले. तर ब्रेल मुद्रणा रुपांतर करिता श्री महेंद्र मोरे यांनी सहकार्य केले.


























































