जेईई मेनची परीक्षा पुढे ढकलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील वाढत्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पेंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी रविवारी जाहीर केला. परीक्षांची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे. 27 ते 30 एप्रिलदरम्यान या परीक्षा घेण्यात येणार होत्या. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केली. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पहिल्या दोन सत्रातील परीक्षा पूर्ण झालेल्या असून, एप्रिलच्या सत्रात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेसाठी सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या 15 दिवस आधी ही तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केले आहे.