कोविड कंट्रोल स्टाफमधील पदे तातडीने भरा, सरकारला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोना रुग्णाची संख्या पाहता रत्नागिरी तसेच इतर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱयावर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने राज्य सरकारला दोन आठवडय़ात उत्तर देण्याचे आदेश दिले आहे.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात व राज्यातील अन्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱयांची संख्या अपुरी असून या अपुऱया कर्मचाऱयामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे तात्काळ वैद्यकीय अधिकाऱयांची भरती करण्यात यावी यासाठी रत्नागिरीतील खलील वास्ता यांनी ऍड. राकेश भाटकर यांच्या मार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेकर आज न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती एस पी ताकडे यांच्या खंडपीठासमोर आज सुनाकणी घेण्यात आली.