मुंबई ते वाराणसी दरम्यान शिक्षकांसाठी विशेष ट्रेन, मध्य रेल्वेने जारी केली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे 4 आरक्षित विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाराणसी दरम्यान उन्हाळ्याच्या गर्दीच्या हंगामात चालवणार असून त्यापैकी दोन शिक्षकांसाठी पूर्णत: राखीव असतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

तपशील खालीलप्रमाणे आहेतः

01053 शिक्षक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 2.5.2022 रोजी सकाळी 10.30 वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी 15.30 वाजता पोहोचेल.
01054 विशेष बनारस येथून दि. 3.5.2022 रोजी 20.00 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दि. 5.5.2022 रोजी 01.00 वाजता पोहोचेल.

01055 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 6.6.2022 रोजी सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी 15.30 वाजता पोहोचेल.
01056 शिक्षक विशेष दि. 14.6.2022 रोजी 20.00 वाजता बनारस येथून निघेल आणि दि. 7.6.2022 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 01.00 वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, ज्ञानपूर रोड स्टेशन

एक प्रथम वातानुकूलित, 3 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, गार्ड ब्रेक व्हॅनसह 8 सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण:

शिक्षकांसाठी दि. 2.5.2022 रोजी सुटणारी विशेष गाडी क्रमांक 01053 आणि दि. 7.6.2022 रोजी बनारस येथून सुटणारी 01056 ची बुकिंग दि. 29.4.2022 रोजी 14.30 वाजता फक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील ईशान्य दिशेला असलेल्या आरक्षण केंद्रातील बुकिंग काउंटरवर सुरू होईल. दोन्ही शिक्षक विशेष गाड्यांमध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही कारण त्या विशेष शुल्कासह विशेष ट्रेन म्हणून धावत आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षकांसाठी विशेष गाड्यांचे बुकिंग झाल्यानंतर, जागा (बर्थ) उपलब्ध असल्यास, उर्वरित जागांसाठीचे बुकिंग दि. 30.4.2022 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर इंटरनेटद्वारे सर्वसामान्यांसाठी खुले असेल, असेही जाहीर करण्यात आले आहे.