भांडुप- कांजुरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारी अर्थात मेगाब्लॉकच्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भांडुप ते कांजुर मार्ग स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आधीच मेगाब्लॉकमुळे गाड्यांना उशीर होत असतो, अनेक गाड्या रद्द होतात. त्यात गणेशोत्सव तोंडावर आल्याने बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी गर्दी उसळलेली असते. त्यात असा तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होत आहेत.