
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात चार मजली जुनी इमारत कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता ही इमारत कोसळली असून यामध्ये काही लोक अडकले आहेत. इमारतीचं नाव अहमद असं असून क्रॉफर्ड मार्केटमधील लोकमान्य टिळक मार्गावरील लोहार चाळीजवळ ही चार मजली इमारत होती.
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) PRO: No person is trapped as the building was already vacated. https://t.co/LZanCbLK0M
— ANI (@ANI) September 20, 2019
इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र या मार्गावर इमारतींची दाटीवाटी असल्याने मदत कार्यात अडचणी निर्माण होत आहेत. या घटनेत अद्याप कुणीही जखमी किंवा मृत झाल्याचे वृत्त नाही.























































