सुनीता विल्यम्स यांना आणण्यासाठी क्रू ड्रगन वापरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (आयएसएस) मध्ये असलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे दोघे अंतराळात अडकले आहेत. ते कधी पृथ्वीवर परत येतील, यासंबंधी अद्याप नासाने स्पष्ट केले नाही. परंतु, आता सुनीता विल्यम्स यांच्या आरोग्याच्या अडचणी वाढल्याने त्यांना परत आणण्यासाठी क्रू ड्रगनचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. विल्यम्स यांच्या स्पेस स्टेशनमध्ये डोळ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

मायक्रोग्रॅव्हीटीमध्ये बराच काळ राहिल्याने डोळ्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. स्पेसफ्लाइट एसोसिएटेड न्यूरो-ऑकुलर सिंड्रोम ही डोळ्याची समस्या उद्भवली आहे. या समस्येमुळे शरीरातील फ्लूइड डिस्ट्रीब्यूशनवर परिणाम होत आहे. यामुळे डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नाही. कमी दिसणे आणि डोळ्याच्या आकारात बदल होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. विल्यम्स यांच्या कॉर्निया, रेटिना आणि लेन्सचे नुकतेच स्पॅन करण्यात आले. त्यातून ही माहिती समोर आली.

कंपनीला जोरदार झटका

स्पेसएक्सच्या स्पेसक्राफ्टवर स्विच करणे बोइंगसाठी मोठा झटका मानला जात आहे. कारण, बोइंगला टीकेचा सामना करावा लागत आहे. आधीच प्रोजेक्टला उशीर झाला असून हे खूप महाग पडत आहे. एअरोस्पेसच्या कंपनीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जर नासा स्पेसएक्सची निवड करणार असेल तर कंपनीची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. नासासमोर सर्वात आव्हानांपैकी एक स्पेससूटचे आव्हान आहे. बोइंग स्टार लायनरसाठी डिझाइन करण्यात आलेले सूट स्पेसएक्स हे क्रू ड्रगनसाठी उपयुक्त नाही.