टी-20 क्रिकेट खेळण्यासाठी ब्राव्होने घेतला निवृत्तीच्या निर्णयावरून यु टर्न

385

चेन्नई -वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने निवृत्तीच्या निर्णयावरून यु-टर्न घेतला आहे. गेल्या वर्षी 25 ऑक्टोबरला सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्राव्होने तडकाफडकी निवृत्ती घोषित केली होती. त्यामुळे ब्राव्हो वेस्ट इंडिज संघाकडून यापुढे खेळणार नाही हे स्पष्ट होते. पण शुक्रवारी ब्राव्होने निवृत्तीच्या निर्णयावरून चक्क माघार घेतली. तीही केवळ टी 20 क्रिकेट खेळण्यासाठी..एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील त्याचा निवृत्तीचा निर्णय मात्र त्याने कायम ठेवला आहे. विंडीज क्रिकेट मंडळातील प्रशासकीय बदलांमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

टी -20 खेळण्यासाठी मी आतुर माझ्या पुनरागमनाच्या निर्णयामुळे मी एकदिवसीय आणि कसोटी सामनेही खेळणार का असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पण मी स्पष्ट करतो की मी एकदिवसीय किंवा कसोटी क्रिकेटमध्ये परतणार नाही. मला वेस्ट इंडिजसाठी केवळ टी २० क्रिकेट खेळायचे आहे. माझ्या मनात हा विचार खूप दिवसांपासून होता. अखेर क्रिकेट मंडळाच्या प्रशासकीय बदलांमुळे मी टी २० मध्ये परतण्याचा विचार केला. मी क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे. टी २० क्रिकेट खेळण्यासाठी मी खूपच आतुर आहे. मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या चाहत्यांना आणि माझ्या नातेवाईकांना धन्यवाद, असे ब्राव्होने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या