आयपीएलवरही कोरोनाचे संकट; पुढे ढकलणार की रद्द होणार?

334

हिंदुस्थानातीलच नव्हे तर जगभरातील मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱया आयपीएल या टी-20 स्पर्धेलाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. आयपीएलला परवानगी देऊ नका, अशी याचिका चेन्नई उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर कर्नाटक सरकारकडूनही आयपीएल रद्द करा, ही मागणी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यानंतर आगामी एक ते दोन दिवसांत महाराष्ट्र सरकारकडून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. बीसीसीआय व आयपीएल आयोजक स्पर्धा आयोजनाबाबत ठाम असले तरी प्रत्यक्षात ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येतेय की रद्द करण्यात येते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आयपीएलच्या लढती कर्नाटकात होऊ नयेत यासाठी कर्नाटक सरकारने पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर लढत न झाल्यास विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवे स्टेडियम शोधावे लागणार आहे.

  • वकील जी ऍलेक्स बेंझिगीर यांनी आयपीएलला परवानगी देऊ नका, अशी याचिका चेन्नई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी होणार आहे.
  • आयपीएलमुळे बीसीसीआयला प्रचंड नफा होतो. त्यामुळे बीसीसीआय ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियमने अर्थातच प्रेक्षकांविनाच लढती खेळवण्यासाठी आग्रही आहे. प्रत्यक्षात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
आपली प्रतिक्रिया द्या