मिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श पायाला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरीत मोसमाला मुकणार आहे. त्याच्याऐवजी आता सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरची वर्णी लागली आहे. अशी माहिती सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापनाकडून बुधवारी देण्यात आली.

दुखापतीमुळे आयपीएलला मुकण्याची मिचेल मार्शची ही दुसरी खेप आहे. याआधी खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे मिचेल मार्शने 2017 साली आयपीएलमधून माघार घेतली होती. दरम्यान, जेसन होल्डर याआधी 2014-15च्या आयपीएल मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. तसेच 2016 साली त्याने कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधीत्व केले होते. नुकत्याच पार पडलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही तो खेळला होता.

आपली प्रतिक्रिया द्या