वय वाढलंय, आता सरावाकडे लक्ष दे कपिलदेव यांचा विराटला सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या फलंदाजीपेक्षा मैदानातील गैरवर्तणुकीने न्यूझीलंड दौऱयात ओळखल्या गेलेल्या विराट कोहलीला माजी कर्णधार कपिलदेव यांनी सल्ला देताना म्हटले की, विराट कोहलीने आता तिशी ओलांडली असल्यामुळे त्याच्या दृष्टीवर परिणाम होऊ लागला आहे. त्याने सरावावर अधिक लक्ष द्यायला हवे.

कपिलदेव पुढे म्हणाले, विराट कोहली ज्या चेंडूवर आधी सहज चौकार मारायचा त्याच चेंडूवर आता तो बाद होत आहे. जेव्हा फलंदाज आत येणाऱया चेंडूवर पायचीत किंवा त्रिफळाचीत होतो तेव्हा त्याला सरावाची जास्त गरज असल्याचे स्पष्टपणे कळून येते, असेही कपिलदेव पुढे म्हणाले.

18 ते 24 वर्षे या कालावधीत खेळाडूंची नजर तीक्ष्ण असते, पण त्यानंतर हालचाली मंदावतात. सुरुवातीला ही बाब मोठी वाटत नाही. पण त्यावर लक्ष दिले नाही तर परिणाम दिसून येतो, असेही कपिलदेव पुढे आवर्जून सांगतात.