क्रिकेट समीक्षक राजू भारतन यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नामवंत क्रिकेट समीक्षक व सिनेसंगीत लेखक राजू भारतन (86) यांचे मुंबईत शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सुमारे 42 वर्षे ‘इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’त विपुल लिखाण करणारे भारतन यांच्या निधनाने क्रिकेट व सिनेसंगीतावर लिखाण करणारा व्यासंगी पत्रकार आणि लेखक कला-क्रीडा क्षेत्राने गमावल्याची भावना मान्यवर व्यक्त करीत आहेत.

अभ्यासू क्रिकेट समीक्षक व व्यासंगी सिनेसंगीत लेखक अशी ओळख असणाऱया राजू भारतन यांनी 1974 साली फिल्म डिव्हिजनच्या ‘दि व्हिक्टरी स्टोरी’ या क्रिकेटवरील पूर्ण लांबीच्या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शनही केले होते. त्यांच्या सहा पुस्तकांत ‘अ सर्व्हे ऑफ द 1952 टूर ऑफ इंग्लंड (1952)’ या क्रिकेटवरील गाजलेल्या कादंबरीचाही समावेश आहे. मत्यानंतर त्यांनी 1977 मध्ये ‘इंडियन क्रिकेट द व्हायरल फेज’ हे पुस्तक लिहिले.

– भारतन यांनी सिनेसंगीतातील दिग्गज गायिका सूरसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले आणि संगीतकार नौशाद यांची चरित्रेही शब्दबद्ध केले आहे.