भांडुपमध्ये क्रिकेटरची निर्घृण हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गुरुवारी रात्री उशिरा भांडुपमध्ये एका तरुणाची लोखंडी सुर्‍याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. राकेश अंबादास पवार (35) असे मृतकाचे नाव होते. तो भांडुप परिसरात उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून प्रसिद्ध होता. पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून पोलीस तिघा अज्ञात मारेकर्‍यांचा शोध घेत आहेत. भांडूप पश्चिमेकडील चंदनवाडी व्हिलेज मार्गावर राकेश त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास तो महावीर पेट्रोल पंप येथे उभा असताना  ही घटना घडली.