
कोळी आगरी एकता समाज मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आई एकवीरा चषक क्रिकेट स्पर्धेसाठी जमलेल्या खेळाडूंनी दिव्यांग मुलांना आर्थिक मदत केली.चाळीस वर्षांपुढील खेळाडूंसाठी मंडळातर्फे लोणावळा येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत असतानाच सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील दिव्यांग मुलामुलींना आर्थिक मदत करण्याचे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मुकेश भंडारी यांनी केले. त्याला प्रतिसाद देत सर्व खेळाडूंनी आर्थिक मदत म्हणून पाच दिव्यांग मुलांना प्रत्येकी पाच हजार रुपये अशी एकूण 25 हजार रुपये मदत केली. यावेळी मोतीराम मराठे, माणिक मराठे, भास्कर कोळी, विजय सोनावणे, दिवाकर म्हात्रे आदी उपस्थित होते.

























































