इतर मुद्द्यावरील लक्ष हटविण्यासाठी माझ्याविरुद्ध गुन्हा!

17
robert-vadra

सामना ऑनलाईन ।नवी दिल्ली

हरयाणामधील गुरुग्राम येथे जमीन घोटाळा केल्याच्या आरोपावरून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच त्यावर वडेरा यांनी मोजक्या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. देशात सध्या निवडणुकांचा मोसम आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. या महत्त्वाच्या मुद्दय़ावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी माझ्याविरुद्धचे 10 वर्षांपूर्वीचे प्रकरण बाहेर काढले आहे. यात नवीन काय आहे, असा सवाल वडेरा यांनी केला.

गुरुग्राम येथे गृहसंकुल आणि व्यापारी संकुले उभारण्यासाठी केलेल्या जमीन खरेदीप्रकरणी वडेरा यांच्याविरुद्ध दंडसंहितेच्या कलम 420, 120 ब, 476, 468 आणि 471 अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. हरयाणातील मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने यापूर्वीच या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना केली आहे. या गुन्ह्यांमध्ये हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा आणि वडेरा यांची एक कंपनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी आणि  एलएफ या दोन कंपन्यांची नावे आहेत. आज सकाळी वडेरांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या