टाळेबंदीनंतर दरोडे आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होईल;‘इनकॉग्निटो इनसाइट्स’ संस्थेचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेला तोंड देण्याची तयारी होत असताना महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये अंशतः किंवा पूर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक मॉल, किरकोळ विक्रीची दुकाने बंद आहेत. अशा दुकानांमध्ये निर्बंध शिथिल झाल्यानंतर दरोडे आणि चोरीच्या घटना यांचे प्रमाण वाढू शकते असे एका सर्वेक्षणात देशातील पन्नास टक्के पोलिसांनी म्हटले आहे. या सर्वेक्षणासाठी 460 पोलीसांची मते घेण्यात आली होती.

‘इनकॉग्निटो इनसाइट्स’ या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. ‘हर घर सुरक्षित’ या ‘गोदरेज लॉक्स’च्या देशव्यापी जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. लोकांनी आपल्या सुरक्षिततेबद्दल जागरूक असावे असा उद्देश या सर्वेक्षणामागे असल्याचे ‘गोदरेज लॉक्स’ चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड श्याम मोटवानी यांनी म्हटले आहे. या अहवालानुसार टाळेबंदी संपूर्णपणे शिथिल झाल्यानंतर या व्यावसायिक जागांमध्ये चोऱयांचे प्रमाण वाढू शकते, असे देशभरातील  50 टक्के पोलिसांचे मत आहे

व्यावसायिक जागांचा विचार केला असता एकूण चोऱयांपैकी निम्म्या चोऱया (54 टक्के) या रस्त्यांच्या कडेला असलेल्या दुकानांत किंवा भरबाजारातील दुकानांमध्ये होतात. कारण या दुकानांमध्ये सुरक्षिततेचे उपाय काटेकोरपणे अवलंबिले जात नाहीत, असे पोलिसांना आढळून आले. हे प्रमाण तुलनेने कमी असले तरी कार्यालयांमध्ये (लहान व मोठी कार्यालये) चोऱया व दुकान फोडय़ांचे प्रमाण 29 टक्के इतके आहे. विनाब्रॅण्डेड कुलपे (32 टक्के)असलेल्या व्यावसायिक ठिकाणी चोऱया अधिक होतात. व्यावसायिक संस्थांच्या तुलनेत चोरांना घरात प्रवेश करणे सोपे असते यावर 69 टक्के पोलिसांनी सहमती व्यक्त केली.

महानगरांमध्ये घरफोडय़ांचे प्रमाण वाढेल

शहरांचा विचार केल्यास मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये टाळेबंदीनंतर व्यावसायिक जागांत घरफोडय़ांचे प्रमाण वाढेल. तर अहमदाबाद, लखनौ, पाटणा, गुवाहाटी यांसारख्या पहिल्या व दुसऱया श्रेणीच्या शहरांमध्ये ही जोखीम तुलनेने कमी असेल. कारण येथे चोऱया वाढतील असे 42 टक्के पोलिसांचे मत आहे.

उत्तर हिंदुस्थानात सर्वाधिक धोका

उत्तर हिंदुस्थानातील व्यावसायिक संस्था व दुकानांमध्ये दरोडे व चोरी यांचा सर्वाधिक धोका आहे. टाळेबंदीनंतर अशा घटनांमध्ये वाढ होईल असे 61 टक्के पोलिसांचे मत आहे. दुसरीकडे पूर्वेकडील प्रदेशात चोऱया व दरोडय़ांची जोखीम कमी आहे. कारण येथील 27 टक्के पोलिसांना गुह्यांत वाढ होईल असे वाटते. तर दक्षिणेकडील भागात घरफोडय़ा वाढतील असे 53 टक्के पोलिसांना वाटते. तर टाळेबंदीत व्यावसायिक जागांमध्ये घरफोडय़ा वाढतील असे पश्चिमेकडील 55 टक्के पोलिसांना वाटते.