मोदींवर टीका करणाऱ्या पत्रकारावर ‘रासुका’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंदिरा गांधी यांच्या ‘आणीबाणी’वरून काँग्रेसला झोडपण्याची एकही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी सोडत नाहीत; पण मोदी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्यावर टीका केल्याबद्दल एका पत्रकाराला तेथील भाजप सरकारने सरळ ‘रासुका’खाली तुरुंगात डांबले आहे. त्या पत्रकाराचे नाव किशोरचंद्र वांगखेम असे असून त्याला एक वर्ष तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

वांगखेम यांना सर्वप्रथम 21 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी कोर्टाने त्यांना जामीन दिला होता. मात्र ही सुटका झाल्यानंतर रासुकाच्या सल्लागार समितीने किशोरचंद्र यांना पुन्हा एका वर्षासाठी ताब्यात घेण्यावर शिक्कामोर्तब केले. तसेच रासुकाच्या सल्लागार मंडळाचा निर्णय योग्य असल्याचे सांगत मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले.