क्राऊडफंडिंगच्या पैशांची ‘मिलाप’ देणार हमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्म ‘मिलाप’ने ’मिलाप गॅरंटी’ धोरण सादर केले आहे. क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून ज्याच्यासाठी निधी उभा केला, त्याने जर काही फसवणूक केली तर निधी देणाऱ्यांना संपूर्ण रक्कम परत करण्याची हमी याद्वारे दिली जाणार आहे. तसेच मिळणारी आर्थिक मदत ही योग्य लाभार्थींपर्यंत पोहोचतेय की नाही याचीही खबरदारी घेतली जाणार आहे. हिंदुस्थानातील अशा प्रकारचे हे पहिलेच धोरण आहे. देणगीदाराने दिलेला प्रत्येक पैसा योग्य व्यक्तीकडे जात आहे. तसेच योग्य कारणासाठी त्या पैशांचा वापर केला जात आहे, याची खात्री आम्हाला मिलाप गॅरंटीच्या माध्यमातून द्यायची आहे, असे ‘मिलाप’चे अध्यक्ष आणि संस्थापक अनोज विश्वनाथन यांनी सांगितले.