
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 18 उद्या, बुधवारपासून पुनर्विकास कामानिमित्त 80 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वाहतुकीत बदल केला आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 12112 अमरावती ते सीएसएमटी एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 11002 बल्लारशाह-सीएसएमटी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत. ऐन दिवाळीत प्लॅटफॉर्म क्रमांक 18 बंद ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.



























































