
इजिप्तचे पिरॅमिड्स आणि त्यातील ममी म्हणजे एक प्रकारचे गूढ आहे. त्यावर कित्येक वर्षे संशोधन सुरू आहे. आताही एका तीन हजार वर्षांपूर्कीच्या ममीचे सीटी स्कॅन करून रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इटलीतील हा प्रयोग ऐतिहासिक संशोधनाचा एक भाग आहे.
इजिप्तमध्ये जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी अंखेखोन्सू नावाच्या एका धर्मगुरूचे पिरॅमीड बांधण्यात आले होते. त्या पिरॅमीडमधील ममीला बाहेर काढून नंतर ते बर्गामो शहरातील सिक्हिक आर्किओलॉजिकल म्युझियममध्ये जतन करून ठेवले होते. आता त्या ममीवर संशोधन सुरू असून मिलान शहरातील पॉलिक्लिनिको हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांपूर्की सीटी स्कॅन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
- ममीचे सीटी स्कॅन केल्याने तिच्या जीवन आणि मृत्यूसंबंधी माहिती मिळेल. तसेच त्याला पिरॅमीडमध्ये ठेवण्यापूर्वी कापडात गुंडाळून ठेवताना कोणकोणत्या गोष्टींचा वापर करण्यात आला होता याचाही उलगडा होईल.
- आधुनिक वैद्यकीय संशोधनासाठी प्राचीन रोग आणि जखमांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. सीटी स्कॅनच्या माध्यमातून कर्करोगाचा किंवा रक्तवाहिन्यांचा अभ्यास करू शकतो आणि हे आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी उपयुक्त ठरू शकते, असे संशोधक सबिना माल्गोरा यांनी सांगितले.



























































