संगणकातील ‘Ctrl+C’ आणि ‘Ctrl+V’चे जनक लॉरी टेस्लर यांचे निधन

980

संगणक अर्थात कंप्यूटर (computer) ही काळाची गरज आहे. जगभरामध्ये बहुतांश काम आज संगणकावर होते. याच कंप्यूटरच्या किबोर्डवरील Ctrl+C आणि Ctrl+V या key चा वापर सर्वाधिक होतो. माहिती कॉपी आणि पेस्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या key चे जनक लॉरी टेस्लर (Larry Tesler) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लॉरी टेस्लर यांनी 1960 च्या दशकामध्ये अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये कंप्यूटर इंजिनियर म्हणून काम सुरू केले होते. आपल्या कामाचा वेग वाढण्यासाठी आणि कामात सुटसुटीतपणा येण्यासाठी त्यांनी कंप्यूटरमध्ये Ctrl+C आणि Ctrl+V या कमांडचा शोध लावला. कारकीर्दीच्या सुरुवातीला झेरॉक्स (Xerox) कंपनीमध्ये काम केलेल्या लॉरी टेस्लर यांनी येथेच Ctrl+C आणि Ctrl+V या key चा शोध लावला. लॉरी यांच्या निधानंतर झेरॉक्स कंपनीने एक ट्वीट करून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांच्या निधनबाबत दु:ख व्यक्त केले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1945 ला न्यूयॉर्क शहरात लॉरी टेस्लर यांचा जन्म झाला. त्यांनी कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्यूएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कंप्यूटरचा वापर सुटसुटीत होण्यासाठी इंटरफेस डिझाईनमध्ये महारथ मिळवले होते. आपल्या कारकीर्दीमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेल्या लॉरी टेस्लर यांनी झेरॉक्स पालो अल्टो रिसर्च सेंटर (Parc)मध्ये सर्वाधिक काळ काम केले.यानंतर त्यांनी स्टीव्ह जॉब्ज यांच्या आग्रहाखातर अॅपल (Apple) मध्ये मुख्य संशोधक म्हणून तब्बल 17 वर्षे नोकरी केली. अॅपल कंपनी सोडल्यानंतर त्यांनी शिक्षणासंबंधी जणजागृतीसह अॅमेझॉन आणि याहू यांच्यासाठीही कार्य केले.

Ctrl+ आणि Ctrl+V माहिती ना?
कंप्यूटर किंवा स्मार्टफोनमध्ये माहिती कॉपी करताना ती आधी सिलेक्ट करावी लागते. माहिती सिलेक्ट करताना Ctrl बटनासोबत C दाबले की ती कॉपी होते. यानंतर ती माहिती अन्य ठिकाणी ठेवण्यासाठी Ctrl बटनासोबत V दाबले की ती तेथे पेस्ट होते. यामुळे माऊससोबत खेळण्यात वेळ जाण्याऐवजी कामात सुटसुटीतपणा आणि वेग येतो.

आपली प्रतिक्रिया द्या