
क्युबा या देशाला तब्बल 40 वर्षांनंतर पंतप्रधान मिळाला. राष्ट्रपती मिगुएल डियाज केनल यांनी 1976 नंतर पहिल्यांदा पंतप्रधानांची निवड केली. पंतप्रधानपदी पर्यटनमंत्री मॅन्युअल मारेरो यांची निवड करण्यात आली. पर्यटनमंत्री असताना मारेरो यांनी क्युबाची आर्थिक भरभराट व्हावी या हेतूने झपाटल्यासारखे काम केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम क्युबाच्या अर्थव्यवस्थेवर दिसला. कम्युनिस्ट पक्षाच्या शासनाला चालना देणे, त्यांच्या सत्तेचे रक्षण करणे हा नियुक्तीसाठीचा मुख्य उद्देश असल्याचे राष्ट्रवादींनी म्हटले आहे.
…म्हणून क्युबाच्या पंतप्रधानपदी कुणीच नव्हते
क्युबामध्ये क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांनी 1076 मध्ये राष्ट्रपतीपद सांभाळले होते. त्यावेळी क्युबाच्या नागरिकांच्या, मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात कॅस्ट्रो यांनी आंदोलन उभारले. त्यानंतर त्यांनी 1959 मध्ये कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली. 1976 पर्यंत ते पंतप्रधानपदी राहिले. 2008 पर्यंत ते राष्ट्रपतीपदावर होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीपदाचा कार्यभार त्यांचे बंधू राऊल कॅस्ट्रो यांच्याकडे सोपवला.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ क्युबाने दिली मंजुरी
कम्युनिस्ट पार्टी ऑफ क्युबाच्या राजनैतिकिक विभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. राष्ट्रपती केनेल यांनी विधानसभेत पंतप्रधानांच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर राष्ट्रपतींनी सर्वसंमतीने स्वाक्षरी केली. कम्युनिस्ट पार्टीचे नेते, माजी राष्ट्रपती राऊल कॅस्ट्रो यांनी मारेरो यांना आलिंगन दिले. मरेरो जनतेची सेवा करण्यासाठी असून कुठल्याही प्रकारचा बदल घडवण्यासाठी येत नाहीत असे कॅस्ट्रो यावेळी म्हणाले.

























































