
सध्या अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर झळकले होते. त्यामध्ये गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी आणि तानाजी गालगुंडे एकाच स्कूटरवर दिसले होते. या धमाल पोस्टरवरून या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. अखेर 17 जून रोजी ‘भिरकीट’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद या कलावंतांनी विनोदाचा धमाका उडवला आहे.



























































