
सामना प्रतिनिधी । राहाता
माहेरी राहत असलेल्या पत्नीच्या नावे फेसबुक अकांऊंट तयार करून त्याच्यावरून अश्लील मेसेज टाकल्या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पती विरूध्द राहाता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
ही घटना २५ नोव्हेंबर रोजी घडली. राहाता येथील मुलीचे संभाजीनगर तालुक्यातील पैठण येथील मयुर दाभाडे याच्याशी २०१५ साली विवाह झाला होता. गेल्या दोन वर्षापासून सदर महिला पतीच्यी घरी न राहाता ती राहाता येथील माहेरी राहाते. तिच्या पतीने २५ नोव्हेंबर रोजी तिच्या नावाने फेसबूक अकाउंट खोलून त्यावरून अश्लील मेसेज टाकले. त्यावरून सदर पत्नीने पती विरोधात नगर सायबर क्राईम विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती.






























































