
सामना प्रतिनिधी, लातूर
सोमवार दि. 18 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उदगीर शहराजवळील हकनकवाडी पाटी येथे उदगीरहून अहमदपूरकडे जाणाऱ्या बसचा व तोंडारपाटी कडून उदगीरकडे येणाऱ्या मोटारसायकलचा समोरासमोर अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, उदगीरहून अहमदपूरकडे जाणारी एसटी महामंडळाची बस क्रमांक एमएच 20 डी 9802 या बसने तोंडारपाटी कडून उदगीरकडे येणाऱ्या मोटारसाकलला समोरासमोर धडक दिल्याने मोटारसायकल स्वार राजा चंद्रकांत भांगे (रा. तोंडारपाटी) याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ मुलानी यांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


























































