सोनू , संज्ञा, अज्ञेय, मणिंदर अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई जिल्हा हौशी सायकलिंग संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा संघटना आयोजित मुंबई अजिंक्यपद सायकलिंग शर्यतीत पुरुषामध्ये सोनू गुप्ताने तर महिला गटात संज्ञा कोकाटेने बाजी मारली. 17 वर्षे मुलांच्या गटात अज्ञेय जनावळेकर तर 14 वर्षे मुलांमध्ये मणिंदरसिंग कुंडी विजेते ठरले.
पूर्व द्रुतगती महामागार्वरील कांजूरमार्ग परिसरातील सर्व्हिस रोडवर झालेल्या पुरुषांच्या 30 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. सोनू गुप्ताने अवघ्या 2 शतांश सेकंदाच्या फरकाने सरशी मिळवत अजिंक्यपदावर नाव कोरले. सोनूने ही शर्यत 43 मिनिटे 41:59 सेकंदांत पूर्ण केली. तर हेच अंतर 43 मिनिटे 42:01 सेकंदांत पूर्ण करणाऱया चिन्मय केवलरामानीला दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. या दोघांच्या तुलनेत 3:09 शतांश सेकंद मागे राहिलेला अक्षय मोये तिसऱया स्थानी राहिला. महिलांच्या सहा किलोमीटर अंतराच्या शर्यतीत संज्ञाने यावेळी चांगलीच तयारी केली असल्याचे पाहायला मिळाले. संज्ञाने मधुरा वायकरला मागे टाकत प्रथमच विजेतेपदावर आपला हक्क सांगितला. प्रिया ढबालियाने तिसरे स्थान मिळवले. मुलांच्या शर्यतीत अज्ञेयने वेद केरकरचे आव्हान परतवून लावत 17 वर्षे वयोगटाची 12 किलोमीटर अंतराची शर्यत जिंकली. या गटात सिद्धार्थ दवंडे तिसरा आला. सहा किलोमीटर अंतराच्या 14 वर्षे मुलांच्या शर्यतीत मणिंदरसिंग कुंडी पहिले स्थान मिळवले.