
परतीच्या पावसाने राज्यभरात थैमान घालून शेतपिकांची माती केली अन् बळीराज्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. पावसामुळे उद्ध्वस्त झालेली शेती आणि बरबाद झालेल्या शेतकऱयाला दिलासा देण्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांचे दौरे सुरू झाले असून सरकारी पंचनाम्यांनाही वेग आला आहे. मात्र बांधावर गेलात… जरा समुद्रकिनाऱयावरही या… अशी आर्त हाक चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या दर्याच्या राजाने घातली आहे. आधी पावसाने, तर आता एकामागून एक येणाऱया क्यार, मामाहासारख्या चक्रीवादळाने मासळी लुटली, तर दुसरीकडे या दुष्काळातून सावरण्यासाठी किनाऱयावर आगोटाची सोय म्हणून सुकायला ठेवलेली सुकी मासळीही पावसात भिजल्याने कुजुन गेली. त्यामुळे भुकेल्या कच्च्याबच्च्यांच्या पोटाची खळगी कशी भरायची, या विचाराने मच्छीमारांच्या पाणावलेल्या डोळ्यांत दिसत आहे ती फक्त चिंता.
सुक्या मासळीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱया धाकटी डहाणू, नवापूर, दांडी, उछेळी या भागात बोंबील, मांदेली, सुकट मोठय़ा प्रमाणात सुकवली जाते. दरवर्षी पावसाळ्यानंतर ऑक्टोबरच्या महिन्यात येथील किनाऱयांवर मासळी सुकवण्यास सुरुवात होते. या काळात सुक्या बोंबीलला 200 रुपये, सुक्या मांदेलीला 150 रुपये किलो व सुकट 100 रुपये किलो असा भाव मिळतो. मात्र संततधार पाऊस सुरूच असल्याने त्याचा फटका सुक्या मासळीला बसला आहे. किनाऱयावर सुकत ठेवलेली मासळी पावसाचे पाणी लागल्याने कुजण्यास सुरुवात झाली आहे. शेकडो टन सुकट, करदीचा चिखल झाला असून बोंबील, मांदेलीची मोठय़ा प्रमाणात नासाडी झाली आहे. सुकी मासळी हातातून गेल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून मच्छीमार भरचक्रीवादळात खोल समुद्रात जात आहेत. मात्र तेथेही जाळ्यात मासळी घावत नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. याशिवाय डिझेल आणि मासेमारीचा खर्चही वाया जात असल्याने कोळीबांधव चिंतेत सापडला आहे.
हजारो कुटुंबांचा रोजगार बुडाला
एकीकडे समुद्रातून अपेक्षित मासे मिळत नसताना मासे सुककून आपला उदरनिर्काह करणाऱया कुटुंबावरही अकेळी पाकसाचा तडाखा बसला आहे. मासे काळकण्याच्या हंगामात पाऊस पडल्याने सुक्या मासळीकरही यंदा मोठे संकट उभे राहणार आहे. त्यामुळे मासळीचा क्यापार क क्यकसाय करणाऱया हजारो कुटुंबांचा रोजगार बुडण्याची भीती व्यक्त होत आहे.
33 नौका सुखरूप
चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतरही जीव धोक्यात घालून खोल समुद्रात गेलेल्या 33 मासेमारी नौका संकटांशी झुंज देत गुजरात आणि दमणच्या तर काही देवगड बंदरात सुखरूप पोहोचल्याची माहिती पालघर जिल्हा प्रशासनाने दिली आहे. चक्रीवादळ सुरू झाल्यानंतर पालघर, डहाणू, वसई आणि उत्तन आदी भागातील सुमारे 1 हजार 411 बोटींशी बिनतारी यंत्रणेने संपर्क साधून त्यांना परत बोलावण्यात आले होते. मात्र या 33 नौकांशी कोणताच संपर्क झाला नव्हता. आता या बोटी सुरक्षित असल्याचे कळताच प्रशासन यंत्रणेसह त्यांच्या कुटुंबांची चिंता काहीशी कमी झाली आहे.
- श्रावण, नवरात्र संपली की खऱया अर्थाने मच्छीमारांचा हंगाम सुरू होते. त्यातही दिकाळीआधी चांगली मासेमारी झाली की खलाशी कामगार, नौकेचे तांडेल यांना पगार देऊन दिकाळी मोठय़ा आनंदात साजरी केली जाते. यंदाही अशीच अपेक्षा नौकाधारकांनी बाळगली होती. मात्र हवामानाने साथ न दिल्याने समुद्रात टाकलेल्या जाळ्यात अपेक्षित मासेच मिळत नसल्याने मच्छीमार बांधक हकालदिल झाले आहेत.
- एका बोटीत 14 ते 15 खलाशांना 12 ते 15 हजार पगार दिला जातो. तांडेलांना 50 हजार पगार तर 800 ते 1000 लिटर डिझेल, बर्फ, जीकनाकश्यक साहित्य अशा एका फेरीसाठी प्रत्येक बोट मालकाला दीड लाखाचा खर्च येतो. यंदा काही मच्छीमार बांधकांना खेपेमागे जेमतेम बारा ते पंधरा हजारांचे मासेच मिळाल्याने मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.






























































