सामना प्रतिनिधी । मुंबई
गुंतवणुकीच्या माध्यमातून जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांना फसविल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींसह त्यांच्या परिकारातील सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचे पुत्र शिरीष कुलकर्णी यांनी अटक होऊ नये म्हणून हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला, मात्र त्यांना १८ जूनपर्यंत अटक करण्यात येऊ नये असे आदेश दिले. तसेच पुढील दहा दिवस तपास अधिकाऱयांसमोर हजर राहण्यासही त्यांना बजावले.
ग्राहकांना फसविल्याप्रकरणी व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींसह त्यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. आपल्याला अटक होऊ नये म्हणून डी. एस. कुलकर्णींचा मुलगा शिरीष यानेही हायकोर्टात अर्ज केला आहे. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्क जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लाकत त्यांना १८ जूनपर्यंत अटकेपासून हायकोर्टाने दिलासा दिला तसेच पुढील दहा दिकस दररोज तपास अधिकाऱयांपुढे हजेरी लाकण्याचे आदेश न्यायमूर्तींनी याकेळी दिले.






















































