चुणचुणीत आणि निडर ’दबंगी’ आर्या

आपल्या वडिलांना भेटण्यासाठी त्याचा शोध घेणाऱया एका मुलीची कहाणी मांडणारी ‘दबंगी – मुलगी आई रे आई’ ही मालिका सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत आहे.

‘दबंगी – मुलगी आई रे आई’ या मालिकेतून आर्या नामक चुणचुणीत आणि निडर मुलीची कहाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या वडिलांना भेटण्यासाठी आसुसलेल्या व त्यांचा शोध घेणाऱया एका मुलीची ही गोष्ट आहे. या शोधात तिला अनेक रहस्ये उलगडतील आणि एकमेकांत गुंतलेल्या नात्यांचा शोध लागेल. ज्याने छोटय़ा आर्याच्या विश्वात मोठी उलथापालथ होईल.

बाल कलाकार माही भद्रा आर्याची भूमिका साकारत आहे. सोबत सई देवधर, आमीर दलवी आणि मानव गोहिल यांसारखे कलाकार या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारत आहेत. ‘दबंगी – मुलगी आई रे आई’ या मालिकेतून नैतिकतेची चाड नसलेल्या तसेच नीतिमूल्यांची जोपासना करणाऱया अशा दोन विरुद्ध विचारसरणींची गोष्ट पाहायला मिळणार आहे.