
सामना ऑनलाईन, संभाजीनगर
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या तीन मित्रांना आज सीबीआय व एटीएसच्या पथकाने उचलले. यापैकी एकाच्या घरातून पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
पाच वर्षांपूर्वी पुण्यात नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गेली पाच वर्षे या प्रकरणाचे कोणतेही धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागले नव्हते. न्यायालयाने कानशिलाखाली लगावताच दाभोळकर प्रकरणातील आरोपी पटापट तपास यंत्रणांच्या गळाला लागले. गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेल्या शरद कळसकर याने दिलेल्या माहितीवरून सचिन अणदुरे या तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते.
अजिंक्य, शुभम व रोहित या तिघांची पहाटे तीन वाजल्यापासून कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रोहितच्या धावणी मोहल्ल्यातील घरावरही छापा टाकण्यात आला. या छाप्यात एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे सापडली असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
बँक डिटेलवरून फंडगचा सोर्स शोधणार
काही तरुणांचे बँक डिटेल आमच्या हाती लागले आहेत. त्या आधारे अटक केलेल्या तरुणांना हत्यार घेण्याबरोबर बॉम्ब बनविण्यासाठी कुठून फंडग व्हायचे याचा सोर्स शोधायचे काम सुरू असल्याचेही त्या अधिकायाने सांगितले. शिवाय दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरलेले हत्यार आणि या तरुणाकडे सापडलेले हत्यार एकच आहे का तेथील बॉqल्स्टक रिपोर्टनंतर स्पष्ट होईल. अजून बयाच महत्त्वाच्या बाबींचा खुलासा व्हायचा बाकी असून तपास सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
उत्तम प्रशिक्षित, कोडवर्डने संभाषण
एटीएसने पकडलेले चारही तरुण बॉम्ब तसेच अन्य हत्यारे बनविण्याच्या कामात उत्तम प्रशिक्षित आहेत. गटागटात इकडची बाब तिकडच्यालाही कळणार नाही अशा अगदी छुप्या पद्धतीने त्यांचे कामकाज चालायचे. तसेच आपली भाषा कोणालाही कळू नये यासाठी ते कोडवर्डचा वापर करायचे. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी कोडवर्ड बनवला होता.
- मंगळवारी पहाटे तीन वाजता सीबीआय व एटीएसच्या पथकाने देवळाईतील मंजित प्राईड सोसायटीत धाड घातली.
- नचिकेत इंगळे याच्या घरावर छापा मारून या पथकाने सचिनचे मेहुणे अजिंक्य शशिकांत सुरळे, शुभम सूर्यकांत सुरळे तसेच रोहित रेगे यांना ताब्यात घेतले.
- नचिकेतचे आई-वडील हे सुरतला गेलेले होते. घरी कोणीही नसल्यामुळे हे पार्टीसाठी एकत्र आले होते. नचिकेतचे रेडिमेड गारमेंटचे दुकान आहे.
…तर जयंत आठवलेंचीही चौकशी करू!
नालासोपारा, पुणे, संभाजीनगर आणि जालना येथून एटीएसने चार तरुणांना हत्यारांसह अटक केल्यानंतर त्यातील दोघांनी दाभोलकर यांची हत्या केल्याचे तपासात म्हटले आहे. तसेच हे चारही तरुण एका संस्थेशी संबंधित असल्याचे समोर येत आहे. त्या तरुणांच्या सोशल मीडियावरून ते कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत ते उघड होणार आहे. त्यामुळे गरज पडलीच तर सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांचीही या प्रकरणात चौकशी करू, असे एटीएसच्या एका अधिकायाने सांगितले.






























































