
शहरातील अक्षरधाम कॉलनीमधील दोन घरे तर राजे शिवाजीनगर येथील एक घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. सुमारे सव्वादोन लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागीने चोरांनी पळवले.
अक्षरधाम कॉलनी येथील किशोर पंडितराव पानसे बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून कपाट फोडले, कपाटातील रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागीने, इतर वस्तू असा सुमारे 1 लाख 99हजाराचा ऐवज पळवण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या घराचे शेजारी असणारे डॉ. राधेश्याम कुलकर्णी यांचेही घर चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे चांदीचे 18 हजार 800 रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. अज्ञात व्यक्तीविरुध्द या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलंगा तालूक्यातील मौजे केळगाव येथील दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. वसीम इक्कबाल पांढरे रा. केळगाव ता.निलंगा यांनी निलंगा पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या मेडीकल दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून रोख रक्कम 10 हजार रुपये पळवण्यात आले. त्याचप्रमाणे शेजारच्या किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून 8 हजार रुपयांचा किराणा दुकानातील माल चोरुन नेण्यात आला.






























































