दादर, माहीमध्ये अँटिजेन चाचण्यांत सापडले 25 रुग्ण, जी/उत्तरमध्ये 18 ठिकाणी मोहीम राबवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी जी/उत्तरमधील दादर आणि माहीममध्ये गेले दोन दिवसांत राबवलेल्या अँटिजेन चाचणी मोहिमेत आतापर्यंत 25 रुग्ण सापडले असून अँटिजेनच्या 75 चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान, सोमवारपासून दादर, माहीम, धारावीत 18 पेक्षा जास्त ठिकाणी मलेरिया, अँटिजेन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मधुमेह चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, दादर आणि माहीम रुग्ण सापडत असल्यामुळे गेले दोन दिवसांत पाच ठिकाणी अँटिजेन चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात गुरुवारी दादरमध्ये तीन ठिकाणी अँटिजेन चाचण्यांचे आयोजन करण्यात आले. यात एकूण 53 चाचण्या करण्यात आल्या. त्यात 19 कोरोना रुग्ण सापडले. आज माहीममध्ये दोन ठिकाणी 22 चाचण्या करण्यात आल्या. त्यात 6 कोरोना रुग्ण सापडले, अशी माहिती जी/उत्तरचे आरोग्य अधिकारी डॉ. वीरेंद्र मोहिते यांनी दिली.