शंभूराज देसाई यांची ही शेवटची टर्म – दगडूदादा सपकाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईडीच्या कारवाईवरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करणाऱया माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांनी कडक शब्दांत समाचार घेतला आहे. शंभूराज देसाई यांची ही शेवटची टर्म असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मंगळवारी माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात येणार आहेत. त्यापूर्वी आज दगडूदादा सकपाळ यांनी आज साताऱयात पत्रकारांशी संवाद साधला.

दगडूदादा सपकाळ म्हणाले, शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांपैकी 80 टक्के आमदार ईडीवाले आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे भाजपची वाट लावत होते. त्यामुळे राजकीय सुडापोटीच ही कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेतील काही लोकांनी गद्दारी केली. त्यांच्या गद्दारीमुळे आम्हाला ‘निष्ठा यात्रा’ काढावी लागली आहे. आमचा शिवसैनिक जागेवर आहे. जे गेले ते लवकरच पदावरून पायउतार होतील आणि त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.