
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील नामांकित श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातही मोठय़ा प्रमाणात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान, दोनच दिवसापूर्वी परिसरात सुरक्षा यंत्रणेकडून मॉकड्रिल केले होते. त्यावेळी परिसरातील गल्ली-बोळासह इनगेट-आउट गेटचीही पाहणी केली होती. विश्रामबाग, फरासखाना पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणाकडून सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्रीपासूनच मंदिर परिसराला पोलिसांसह खासगी सुरक्षा रक्षकांनी वेढा दिला आहे. सुरक्षा यंत्रणेकडून भाविकांसह आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे.