डहाणूत पिकअपच्या धडकेत परिचारिकेसह मोटर सायकलस्वारचा मृत्यू

666
accident

डहाणूमध्ये पीकअपने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने ऐना प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेसह अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. प्रिया संखे व  यशवंत गोरखना अशी मृतांची नावे आहे.

प्रिया संखे या गेल्या पाच वर्षांपासून ऐना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे परिचारिका होत्या. त्या मोटरसायकलाने घराकडे परतत होत्या. त्यावेळी भरधाव आलेल्या पिकअप गाडीने त्यांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, संखे आणि गोरखाना यांना जबर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तत्काळ डहाणू येखील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या