कोकणातील दहीहंडी उत्सवावर यंदा पूरस्थितीचे सावट

214

गोविंदा आला रे आला़..गोविंदा रे गोपाळाच्या तालावर वाजत गाजत रत्नागिरीमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. कोकण, कोल्हापूर आणि सांगली मध्ये आलेल्या पूरपरिस्थितीचे सावट आजच्या दहीहंडी उत्सवावर दिसून आले.

रत्नागिरी परिसरातील मोठ्या दहीहंडी रद्द झाल्यामुळे दहीहंडीचा उत्साह आणि जोश दिसून आला नाही. पारंपारिक दहीहंड्यांनी मात्र उत्सवाची परंपरा कायम राखली. गोविंदा पथकांनी थरावर थर रचून दहीहंड्या फोडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील 341 सार्वजनिक आणि 3099 खासगी दहीहंड्या फोडण्यात आल्या. यंदा एसटी स्टॅण्ड समोरील दहीहंडी आकर्षण ठरली होती. सायंकाळनंतर रत्नागिरीकरांनी दहीहंडी पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दहीहंडी उत्सव रदद करून पूरग्रस्तांना मदत

रत्नागिरी जिल्ह्यात 10 सार्वजनिक दहीहंड्या आणि 140 खासगी दहीहंडी रदद करण्यात आल्या. या दहीहंडी उत्सव मंडळांनी दहीहंडीचा सर्व खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून दिला. शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने मांडवी येथे दरवर्षी होणारी दहीहंडी यंदा रद्द करण्यात आली. या दहीहंडीसाठी येणारा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. तसेच साळवीस्टॉप येथील दहीहंडी रद्द करुन पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या