शनिवारी रंगणार दहिसर श्री 2020 स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहिसर स्पोर्टस् फऊंडेशन आयोजित मुंबईतील ‘दहिसर श्री 2020’ शरीरसौष्ठव स्पर्धा शनिवार, 1 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता दहिसरमध्ये रंगणार आहे. स्पर्धेचे हे 16वे वर्ष असून आंतरराष्ट्रीय, नामवंत शरीरसौष्ठवपटू सहभाग घेत आहेत. स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपनेते म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, शिवसेना विभाग संघटक सुजाता शिंगाडे उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष प्रयेश पाटील यांनी केले असून सहभागासाठी शरीरसौष्ठव संघटक सुनील शेगडे यांच्याशी संपर्क साधावा.