Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’30 नोव्हेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Wednesday, November 30, 2022)
आरोग्याची काळजी घ्या. दुर्गादेवी मंदिरात प्रसाद वाटा. जुन्या गुंतवणुकीचा उत्तम नफा मिळण्याची शक्यता आहे. दैनंदिन व्यापातून स्वत:साठी थोडा वेळ काढाल. जिथे बोलण्याची आवश्यकता नाही तिथे बोलू नका. प्रिय व्यक्तिसोबत सिनेमा पाहण्याचा प्लान कराल. मनाला प्रसन्नता देणाऱ्या ठिकाणांना भेट द्याल.
शुभरंग : हिरवा

वृषभ (TAURUS -Wednesday, November 30, 2022)
मार्गशीर्ष महिन्यात श्रीविष्णुचे स्मरण करा. व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसण्यासाठी प्रयत्न कराल. स्वत:साठी वेळ काढा. करमणुकीच्या कार्यक्रमांकरिता पैसे खर्च होतील. कुटुंबियांच्या समस्या ऐकून त्या सामंजस्याने सोडवण्याकडे लक्ष द्याल. आजचा दिवस आनंददायी असेल. कार्यालयातून घरी जाताना प्रिय व्यक्तिसाठी मोगऱ्याचा गजरा घेऊन जा. अति खर्च करणे टाळा.
शुभरंग : राखाडी

मिथुन (GEMINI – Wednesday, November 30, 2022)
पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. आहाराची पथ्ये सांभाळावी लागतील. दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक बातमीने होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक प्रश्न मित्रांचा सल्ला ऐकाल. कोणाकडून तरी छानशी ट्रिट मिळेल. जवळच्या लोकांसोबत वेळ घालवाल. अनपेक्षितपणे एखादी संधी आयुष्यात येण्याची शक्यता आहे. सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावा.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER – Wednesday, November 29, 2022)
चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम आणि आहार याकडे लक्ष द्या. सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायला जाल. मित्रमैत्रिणींसोबत आल्हाददायक क्षणांचा अनुभव घ्याल. सकारात्मक राहा. प्रिय व्यक्तिच्या अचानक भेटीमुळे आनंदात भर पडेल. रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागाल. कोणी कितीही कटकट केली तरी मन विचलित होऊ देऊ नका.
शुभरंग : राखाडी

सिंह (LEO – Wednesday, November 30, 2022)
मारुतीच्या देवळात गूळ आणि चण्याचा प्रसाद वाटा. शारीरिक दुखापत होणार नाही, याची काळजी घ्या. स्वत:कडे लक्ष द्या. सकाळी सूर्यनमस्कार घाला. घरगुती कामात जोडीदाराची मदत होईल. नवीन मित्र जोडाल. आजचा दिवस लाभदायक आहे. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना सावध राहाल. कार्यालयात मिळून-मिसळून वागा.
शुभरंग : निळा

कन्या (VIRGO – Wednesday, November 30, 2022)
संयम बाळगा. सातत्याने प्रयत्न केल्यामुळे यशप्राप्ती हमखास होणार याची खात्री बाळगा. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मनावर दडपण येऊ शकते. जोडीदाराला समजून घ्याल. छोट्या सहलीला जाण्याचे नियोजन कराल. बऱ्याच अर्धवट राहिलेल्या गोष्टी पूर्ण झाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल. मारुतीरायाचे दर्शन घेऊन भीमरुपी महारुद्रा स्तोत्र वाचा.
शुभरंग : केशरी

तूळ (TULA- Wednesday, November 30, 2022)
पांढऱ्या गाईला पोळी खाऊ घाला. कुटुंबियांच्या अपेक्षांना न्याय द्याल. म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रांसोबत स्नेहमेळावा असल्यामुळे दिवस छान जाईल. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवाल. आजचे काम उद्यावर ढकलू नका. प्रेमाच्या नात्याचा सुखद अनुभव घ्याल. नवीन कला आत्मसात करण्यासाठी प्रयत्न कराल.
शुभरंग : खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, November 30, 2022)
आशावादी राहा. स्वत:वर विश्वास ठेवा. जुने मित्र आधार देतील. रिकामा वेळ आवडते संगीत ऐकण्यात किंवा पुस्तक वाचण्यात घालवाल. जुन्या आठवणीत रमाल. प्रवासात वाहन जपून चालवा. अबोलीचे रोपटे घराच्या अंगणात लावा. उगाच चिंता करू नका. जोडीदाराला लाडीगोडी लावून तुम्हाला हवी ती गोष्ट साध्य करू शकाल. रामरक्षा वाचा. घरात एखादे धार्मिक कार्य केल्यास लाभ होईल.
शुभरंग : तांबडा

धनु (SAGITTARIUS – Wednesday, November 30, 2022)
गायीला हिरवे गवत खाऊ घाला. वरिष्ठ आज तुमच्यावर खूश होतील. महत्त्वाच्या कामाची फाईल चोख असल्याची खात्री केल्याशिवाय कोणाच्याही हाती देऊ नका. रिकाम्या वेळी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे, असे वाटू लागेल. विनाकारण चिंता करणे सोडून द्या. रागावर नियंत्रण ठेवा. कोणीतरी खास व्यक्ती आज तुमचे लक्ष वेधून घेईल. आंघोळीच्या पाण्यात भिमसेनी कापूर घाला.
शुभरंग : जांभळा

मकर ( CAPRICORN – Wednesday, November 30, 2022)
आहारात मधाचे सेवन करा. कुणीतरी तुमचा मूड बिघडवण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही त्याला यशस्वी होऊ देऊ नका. मार्गशीर्ष महिना सुरू असल्याने श्रीविष्णसहस्त्रनामावलीचे वाचन करा. जोडीदाराकडून चांगली बातमी कानावर येईल. आवडत्या व्यक्तिची भेट होईल. मन प्रसन्न राहिल. वायफळ गप्पा मारण्यात वेळ वाया जाणार नाही, याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
शुभरंग : निळा

कुंभ (AQUARIUS – Wednesday, November 30, 2022)
गुलाबाच्या फुलांचा गुच्छ तांब्याच्या जारमध्ये ठेवून घरात ठेवा. मित्र परिवार आणि नातेवाईकांबरोबर मजा करा. कठीण परिस्थितीत देवाची साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामावर पूर्ण लक्ष एकाग्र करा. शक्य होईल तेवढे आज अन्नदान करा. नको त्या गोष्टींचा विचार कमी केलात की, मनाला शांतता लाभेल. कुटुंबीय तुम्हाला समजून घेतील.
शुभरंग : जांभळा

मीन (PISCES – Wednesday, November 30, 2022)
पाण्यात गंगाजल घालून स्नान करा. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. मिळालेल्या रिकाम्या वेळेचा मनसोक्त आनंद घ्याल. आजचा दिवस भरपूर आनंदाचा आहे. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. घनिष्ट मित्रांच्या भेटीगाठी होतील. भविष्यात करायच्या कामांचे नियोजन करा. घरात एखादा छोटासा समारंभ साजरा होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : सोनेरी