चिनी बंदुकीच्या दडपशाहीला तिबेटी ‘सत्या’च्या लढय़ाने उत्तर देतील – दलाई लामा

435

कम्युनिस्ट चीनने बंदुकीच्या बळावर चालवलेल्या दडपशाहीला तिबेटियन बुद्धिष्ट ‘सत्या’चा लढा लढून उत्तर देतील, असे प्रतिपादन तिबेटी धर्मगुरू आणि जागतिक शांततेसाठी अहिंसात्मक लढा देणारे दलाई लामा यांनी तथागत गौतम बुद्धाच्या गयेतील (बिहार) महाबोधी मंदिराला दिलेल्या भेटीत केले.

पारंपरिक बौद्ध धर्माचे वर्चस्व असलेल्या चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यावर बौद्धांसह अन्य धर्मीय नागरिकांवर अनन्वित अत्याचार सुरू झाले. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अत्याचारामुळे आम्हा बौद्धांना हिंदुस्थानात आश्रय घ्यावा लागला. पण 1959 पासून आम्ही चीनविरोधातील आमचा शांततामय लढा सुरू ठेवला आहे. गौतम बुद्धांची अहिंसा आणि सत्याची शिकवण हे आमचे प्रमुख अस्त्र्ा होते. त्याच्याच बळावर आता चीनमध्ये तिबेटियन बौद्ध नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आम्ही गेली अनेक दशके ‘सत्या’ने दिलेल्या लढय़ापुढे चिनी बंदुका फेल झाल्या आहेत, असे उद्गार दलाई लामा यांनी बुधवारी महाबोधी मंदिरात बोलताना काढले. ते बोधगयेच्या वार्षिक भेटीसाठी बिहारच्या गया शहरात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या