
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
छातीत जंतुसंसर्ग झाल्यामुळे तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांना दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. छातीत जंतुसंसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दिल्लीत झालेल्या जागतिक परिषदेत त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर ते धरमशाला येथे परतले होते; मात्र जंतुसंसर्ग झाल्याने त्यांना पुन्हा दिल्लीत आणण्यात आले. दरम्यान, दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्याला चिनी सत्तारुढ पक्षाची मान्यता मिळवावी लागेल. त्यानंतरच त्याला लामांचा उत्तराधिकारी म्हणून स्वीकारण्यात येईल, असे चीनने स्पष्ट केले आहे.

























































